Tuesday, 14 March 2017

Day's Special

महत्वाचे दिनविशेष...
============
सर्वांना पाठवा....

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

Tuesday, 17 January 2017

Moral story

*बोधकथा*
         📚📚📚📚📚📚
            *क्रोधावर नियंत्रण*
एक १० १२ वर्षाचा मुलगा होता. लहानपणापासूनच खूप हट्टी आणि संतापी होता. जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडे तेंव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढे. रागाने तो वेडापिसा होत असे. त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला, वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेवून आले. मुलाने विचारले,"बाबा! हे खिळे कशासाठी?" वडिलांनी उत्तर दिले,"अरे ! तुला जेंव्हा कधी राग येईल तेंव्हा यातील एक खिळा घे आणि समोरच्या झाडावर ठोक". खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूप राग आला, त्याने एकूण ३० खिळे झाडाला ठोकले. असेच तो प्रत्येक वेळी करत गेला. पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश आले. आता तो झाडावर एखाददुसरा खिळाच ठोकत असे. त्याच्या हे लक्षात आले कि झाडाला खिळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणे कधीही सोपे आहे. शेवट एक दिवस तर असा उजाडला कि त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खिळा ठोकला नाही. जेंव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले तेंव्हा त्याच्या वडिल म्हणाले," तू जसे ते खिळे ठोकले तसे ते सर्व खिळे झाडावरून काढून टाक" मुलाने खिळे काढायला सुरुवात केली तसे त्याच्या लक्षात आले कि खिळे मारणे सोपे आहे पण खिळे काढणे खूप अवघड काम आहे. त्याने खूप मेहनत घेवून ते खिळे काढले व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेवून आला. वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणाले," तू काम तर चांगले केले. पण तुझ्या एक लक्षात आले कि नाही, बघ हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू किती खराब करून टाकले आहेस. तू जेंव्हा जेंव्हा रागाला येत होता त्याचे वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावे लागत होते. तसेच आपल्या वागण्याचेही तसेच असते असेच कि आपण जेंव्हा रागात येतो तेंव्हा आपल्या रागाचे दुष्परिणाम समोरच्याच्या मनावर होतात. शस्त्राने जेवढे घाव होणार नाहीत तेवढे जास्त वार रागाच्या भरात माणूस समोरच्यावर करतो. म्हणून रागापासून दूर राहणे हेच चांगले असते.
*तात्पर्य*:-
*"अति राग आणि भिक माग" हि मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. राग आवरणे हेच चांगले.*